Home नांदेड मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू

मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू

135

आशाताई बच्छाव

1000810959.jpg

मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड, दि. 3 ऑक्टोबर : केंद्र शासनाचे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत एन.सी.सी.एफ च्यावतीने जिल्ह्यात खरीप हंगाम 2024-25 मध्ये हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी 1 ऑक्टोबर पासून ऑनलाईन पोर्टलवर नोंदणीसाठी 13 खरेदी केंद्र निश्चित केली आहेत. शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणीसाठी चालू हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा ऑनलाईन पिकपेरा नोंद असलेला 7/12 उतारा, आधारकार्ड व बँकपासबूक इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुक्यातील खरेदी केंद्रावर देऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.

प्रत्यक्षात मुंग, उडीद खरेदी 10 ऑक्टोबर व सोयाबीन खरेदी 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. या खरेदी केंद्रात मुखेड तालुक खरेदी विक्री संघ मुखेड, हदगाव तालुका खरेदी विक्री संघ हदगाव, लोहा तालुका खरेदी विक्री संघ लोहा, कृषि उत्पान्न बाजार समिति किनवट, तालुका खरेदी विक्री संघ बिलोली (कासराळी), पंडित दीनदयाल उपाध्याय अभिनव सह. संस्था देगलूर, मृष्णेश्वर फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. धनज (ता. मुखेड), सिद्राम फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. बेटमोगरा (ता. मुखेड), किनवट तालुका कृषिमाल प्रक्रिया सह. संस्था गणेशपूर (ता. किनवट), तिरुपति शहापूर फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. वन्नाळी (ता. देगलूर), राधामाई फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. रातोळी (ता.नायगाव), अष्टविनायक शेतीमाल खरेदी विक्री सह. संस्था मानवाडी फाटा (ता. हदगाव), व श्रीजगदंब फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. जांब (बु) (ता. मुखेड) या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत मूग, उडीद, सोयाबीन ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू झाली आहे.

Previous articleतात्‍पुरते फटाका परवानासाठी 26 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.
Next articleभाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे व डॉ.मिलिंदजी नरोटे यांनी घेतली मारहान झालेल्या विद्यार्थिनींची भेट.._
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.