Home गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे व डॉ.मिलिंदजी नरोटे यांनी घेतली मारहान झालेल्या विद्यार्थिनींची...

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे व डॉ.मिलिंदजी नरोटे यांनी घेतली मारहान झालेल्या विद्यार्थिनींची भेट.._

213

आशाताई बच्छाव

1000810967.jpg

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे व डॉ.मिलिंदजी नरोटे यांनी घेतली मारहान झालेल्या विद्यार्थिनींची भेट.._

(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)

गडचिरोली :- सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका उज्वला पाटील यांनी इयत्ता सातवी वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पाण्याच्या बाटलीमध्ये काही टाकल्याच्या शिल्लक कारणावरून 17 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केले.
यात धनश्री हरिदास दहेलकर व लावण्या कुमदेव चौधरी या विद्यार्थिनीं बेदम मारहाण केल्यामुळे जखमी झाल्या व त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचाराकरिता भरती करण्यात आले.
घटनेची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांना मिळताच त्यांनी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी आघाडी जिल्हा प्रभारी डॉ.मिलिंदजी नरोटे,भाजपा ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सचिव किसान मोर्चा रमेशजी भुरसे,भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिलजी पोहनकर यांना सोबत घेऊन रुग्णालय गाठले व विद्यार्थिनींची तसेच त्यांच्या पालकांची भेट घेऊन घटनेबद्दल सविस्तर विचारपूस केले. व पालकांना धीर देत विद्यार्थ्यांनींची काळजी व काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिले.

Previous articleमूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू
Next articleजागृती फाऊंडेशन(नाशिक) आयोजित पितृपक्ष व नवरात्री विशेष अन्नदान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.