Home जालना जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा शेळगाव आटोळचे विद्यार्थी देशपातळीवर पोहोचवणार...

जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा शेळगाव आटोळचे विद्यार्थी देशपातळीवर पोहोचवणार -मधुकर सुरडकर मुख्याध्यापक

156
0

आशाताई बच्छाव

1000807942.jpg

जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा शेळगाव आटोळचे विद्यार्थी देशपातळीवर पोहोचवणार -मधुकर सुरडकर मुख्याध्यापक
प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 03/10/2024
याविषयी सविस्तर माहिती अशी की, जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा शेळगाव आटोळ येथील सेवा जेष्ठ शिक्षक श्री यु .टी. परिहार सर यांनी आपल्या अनेक वर्षांच्या दीर्घ अनुभवानंतर शेळगाव आटोळ येथील इयत्ता चौथीतील बहुतांश विद्यार्थ्यांचे बॉडी पार्ट्स पूर्णपणे तोंड पाठ करून घेतले. त्याबद्दल यु.टी.परिहार सरांचं आणि विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री मधुकर सुरडकर सर यांनी भरभरून अभिनंदन केले.जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा शेळगाव आटोळ हि बुलढाणा जिल्ह्यातील आदर्श शाळा म्हणून निवड झालेली शाळा आहे.या शाळेतील सर्वच शिक्षक आपल्यातील असलेले कलागुण विद्यार्थ्यांमध्ये बिंबविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असतात.विशेष म्हणजे रविवारी व सुटीच्या दिवशीही या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक अतिरिक्त शिकवणी वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात पारंगत करण्यासाठी मेहेनत घेत आहेत.सुटीच्या दिवशी शाळा भरविण्यात येणारी हि एकमेव शाळा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.शेळगाव आटोळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळेचे विद्यार्थी देशपातळीवर आपला ठसा उमटवितील यासाठी आम्ही सर्व शिक्षक प्रयत्न करत असल्याचं मुख्याध्यापक मा.मधुकर सुरडकर सर यांनी सांगितले आहे.यावेळी श्री यु.टी.परिहार सर व इतर सर्व शिक्षकांचे मुख्याध्यापक श्री सुरडकर सर यांनी अभिनंदन केले.

Previous articleनिवडणुकीपूर्वी मराठ्यांच्या मागणीचा विचार करा: मनोज जरांगे
Next articleज्येष्ठ हेचि श्रेष्ठ : रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी संगम व कवी कट्टा परिवार तर्फे ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सन्मान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here