Home बुलढाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार ; तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार ; तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग !

35
0

आशाताई बच्छाव

1000787947.jpg

:शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार ; तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग !
मोताळा::- जळगाव खान्देश शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (जीएमसी) ‘स्त्रीरोग’ विभागातील पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षातील चार विद्यार्थीनी व दोन विद्यार्थ्यांची रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात द्वितीय वर्षातील तीन विद्यार्थीनींनी २५ सप्टेंबर रोजी सहा जणांची रॅगिंग केल्याचे राष्ट्रीय हेल्पलाईनला ई- मेलव्दारे कळविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर जिल्हापेठ पोलिसांनी जीएमसीमध्ये येत पीडित विद्यार्थ्यांची चौकशी केली.
महिला पोलिसांसमोर तिघींचीही चौकशी
जीएमसीच्या अधिष्ठाता विभागाने पीडित विद्यार्थ्यांसोबत संपर्क साधला. गुरुवार सकाळी पीडित विद्यार्थीनींनी व दोन विद्यार्थ्यांनी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांची भेट घेऊन रॅगिंग विषयी माहिती दिली. यानंतर रॅगिंग ragging करणाऱ्या तीन विद्यार्थीनींना बोलविण्यात येऊन महिला पोलिसाच्यासमोर चौकशी करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here