Home बुलढाणा खळबळ ! विवाहीत महिलेवर धारदार शस्त्राने वार .. महिला जागीच ठार !...

खळबळ ! विवाहीत महिलेवर धारदार शस्त्राने वार .. महिला जागीच ठार ! संशयीत पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात !

99

आशाताई बच्छाव

1000787931.jpg

खळबळ ! विवाहीत महिलेवर धारदार शस्त्राने वार .. महिला जागीच ठार ! संशयीत पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- साखरखेर्डा घरगुती कारणावरून पती पत्नी मध्ये झालेल्या भांडणातून पतीने पत्नीवर चक्क धार धार शस्त्राने वार करुन ठार मारल्याची घटणा लोणी येथे आज २७ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. पोलिसांनी पतीस ताब्यात घेतले आहे .
लोणी (लव्हाळा) येथील नंदकिशोर देशमुख (इंगळे ) आणि पत्नी प्रगती नंदकिशोर देशमुख हे दोघे राहातं होते. त्यांना दोन मुले आहेत. २७ सप्टेंबर रोजी किरकोळ कारणावरून पती पत्नी मध्ये वाद झाला. हा
वाद टोकाला जाऊन नंदकिशोर देशमुख यांने धार धार शस्त्राने वार करुन प्रगती हिला ठार मारले. ही वार्ता गावात पसरताच पोलीस पाटील यांनी उपरोक्त घटणेची माहिती साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांना दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पती नंदकिशोर देशमुख यास ताब्यात घेतले. मृतक प्रगती नंदकिशोर देशमुख हिचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. मृतकाच्या नातेवाईकांना साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये तंक्रार देण्यासाठी बोलावले असून त्यांच्या तंक्रारीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे ठाणेदार गजानन करेवाड यांनी सांगितले.

Previous articleशेतात वीज पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू; तीन गंभीर जखमी
Next articleपॉलिटिक्स चिखलीत आरोप प्रत्यारोपाचे राजकारण! काँग्रेस भाजपावर भारी !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.