Home जालना ड्रोन वर पारध पोलिसांची करडी नजर रात्री ड्रोन दिसल्यास संपर्क करण्याचं श्री....

ड्रोन वर पारध पोलिसांची करडी नजर रात्री ड्रोन दिसल्यास संपर्क करण्याचं श्री. संतोष माने यांचं आवाहन.

129

आशाताई बच्छाव

1000783856.jpg

ड्रोन वर पारध पोलिसांची करडी नजर
रात्री ड्रोन दिसल्यास संपर्क करण्याचं श्री. संतोष माने यांचं आवाहन.
तालुका प्रतिनिधी जाफराबाद-मुरलीधर डहाके दिनांक 27/09/2024
भोकरदन तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री ड्रोन दिसत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.कोणत्याहीनागरिकांना रात्री ड्रोन आढळून आल्यास पारध पोलीस स्टेशनशि संपर्क साधावा असे आवाहन पारध ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी नागरिकांना केले आहे.
दरम्यान पारध पोलिसांच्या वतीने ड्रोन बाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली असल्याची माहिती पारध पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक संतोष माने यांनी दिली.
भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीत तेहतीस गावाचा समावेश आहे .आगामी सण व उत्सव लक्षात घेऊन पोलिसांनी सोशल मीडियावर जातीत तेढ निर्माण करणाऱ्यां पोस्ट टाकू नये असे आवाहन केले आहे .सोशल मीडिया व व्हाट्सअप ग्रुप द्वारे कोणतेही जाती- जातीत तेढ निर्माण करून वाद निवाद भडकवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील. ड्रोन बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. संतोष माने सहाय्यक पोलीस निरीक्षक पारध.

Previous articleजाफराबाद तालुक्यात तीन दिवसा पासून पावसाची संततधार
Next articleरोझेतील अकार्यक्षम ग्रामसेविका बदलीसाठी आमरण उपोषणाचा इशारा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.