Home वाशिम फार्मसी कॉलेज ने राबविले स्वच्छता अभियान

फार्मसी कॉलेज ने राबविले स्वच्छता अभियान

154

आशाताई बच्छाव

1000781695.jpg

फार्मसी कॉलेज ने राबविले स्वच्छता अभियान

वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ):- आज दिनांक २४/०९/२०२४ राष्ट्रीय सेवा योजना दिना निमित्त श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोंढाळा झांबरे वाशिम येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने वाशिम येथील मुख्य बस स्थानक येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
या अभियानाला संस्थेचे संस्थापक डॉ . रामक्रिष्ण शिंदे साहेब , सौ.सुनिता ताई शिंदे व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्वाती देशमुख मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या अभियानाला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. विनायक काटेकर सर व महिला अधिकारी प्रा. मानसी.चौधरी मॅडम यांचे सहकार्य लाभले. या दरम्यान वाशिम बस स्थानकावर स्वच्छता करून प्रवाशांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे आयोजन अक्षय शामसुंदर राष्ट्रीय सेवा योजना संयोजक व कुमारी रश्मी गडलिंग राष्ट्रीय सेवा योजना संयोजक यांच्यावतीने करण्यात आले.
तसेच या कार्यक्रमाला पथकाचे विद्यार्थी ओम खेडकर , प्रणव बेलोकार, मयूर नंदेश्वर,आनंद मस्के, बालाजी तडस ,शशांक, काकडे,कु. आकांक्षा सोनोने, कुमारी साक्षी बघमारे, कु. दिपाली काळे असे अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleभगूर रेल्वे बोगदा नागरिकांना सद्या गैरसोईचा
Next articleहिंगोली जिल्हा पोलीस अधिकारी यांच्याकडे आ. संतोष बांगर यांनी पैसे वाटत असल्याची तक्रार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.