आशाताई बच्छाव
माहोरा येथे स्काऊट गाईड संघ नायक प्रशिक्षण शिबीर संपन्न…. तालुका प्रतिनिधी जाफराबाद- मुरलीधर डहाके.25/09/2024
दि. 24/09/2024 रोजी श्री छत्रपती शिवाजी प्रा. व मा. आश्रम शाळा, माहोरा येथे तालुकास्थरीय स्काउट गाइड संघ नायक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. यासाठी जिल्हा स्काउट गाइड संघटक, श्री के.एल.पवार सर, श्री नंदू आढे सर, संदीप पाटील सर, श्री सोन्नी सर, श्री भोसले सर, शाळे चें मुख्यध्यापक श्री संदीप सिनगारे सर,
तसेच परिसरातील शाळेच्या स्काउट गाइड युनिट च्या जवळपास 100विद्यार्थ्यांची उपस्थिती होती, या वेळी विद्यार्थ्यांना स्काउट गाइड चळवळ विषयीची माहिती, विविध खेळ, गीत, पथ संचालन इ. चे प्रशिक्षण दिले..या वेळी पी. एम.पोषण मासा निमित्त रान भाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. आलेल्या प्रमुख पाहुणे,विद्यार्थी यांनी या प्रदर्शना चा लाभ घेतला….हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी शाळेचे मुख्यध्यापक श्री संदीप सिनगारे सर, श्री चंदनशिव सर, श्री दांडगे सर, श्री उबाळे सर, श्री गायकवाड सर, श्री चरण सर, श्री दिपक सर, श्रीमती कड मॅडम, कु. हांडगे मॅडम, श्री वाघ सर डुकरे सर,दांडगे मामा आदींचें सहकार्य लाभले…






