आशाताई बच्छाव
वाशिम, निखिल धुत –पोलिस स्टेशन अनसिंग हद्दीतील ग्राम वारला याठिकाणी दि. 23.09.24 रोजी पहाटे 5.30 वाजता मानवतेला जागृत केली. एक दिवसाच्या नवजात शिशुला (बालिका) जीची नाळ देखील कापली नव्हती अश्या निष्पाप जीवाला रस्त्यावर फेकून दिले होते. त्याच वेळी डायल 112 यंत्रणेवर कार्यरत आमचे सहकारी मित्र श्री अजय महल्ले, पोलीस कॉन्स्टेबल व चालक कॉन्स्टेबल श्री अमीन गोरवे यांनी एक दिवसाच्या नवजात शिशु ला ममतेने जवळ घेवून जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे सुपूर्द केले. सर्व यंत्रणेचे मानवतेतून हार्दिक अभिनंदन करतो सलाम आपल्या कार्याला जय हिंद, सर्व शक्तिमान ईश्वर जेव्हा मुल जन्माला येते तेव्हा केवळ स्मित करते परंतु जेव्हा एक मुलगी जन्माला येते तेव्हा ईश्वर केवळ स्मित च करत नाही तर म्हणतो की, ही जगाच्या नित्यांताची स्वाक्षरी आहे