Home बुलढाणा महावितरणचे वीजचे पोल घेऊन जात असताना मोताळा तालुक्यातील पुन्हाई गावाजवळ घडला अपघात,...

महावितरणचे वीजचे पोल घेऊन जात असताना मोताळा तालुक्यातील पुन्हाई गावाजवळ घडला अपघात, अपघातात दोन मजूर जागीच ठार…….

148

आशाताई बच्छाव

1000774685.jpg

महावितरणचे वीजचे पोल घेऊन जात असताना मोताळा तालुक्यातील पुन्हाई गावाजवळ घडला अपघात, अपघातात दोन मजूर जागीच ठार…….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- मोताळा तालुक्यातील पूनई गावाजवळ दुपारच्या सुमारास पुन्हई गावशिवारात रविवारी (दि.22) अपघात घडला असून कंत्राटदाराच्या कामावरील मजूर असून हे विजेच्या पोलची वाहतूक करीत असताना ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने मोठा अपघात झाला. ट्रॉली पलटी झाल्यामुळे त्यामध्ये बसलेल्या २ मजूरांचा पोलखाली दबून घटनास्थळी मृत्यू झाला. ट्रॅक्टर मधील तिसरा मजूर गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रामदास पुंजाजी बेलोकार( ४० वर्ष) आणि मंगेश ज्ञानदेव सातव (३२ वर्ष) रा. वाडी महालूंगी ता. नांदूरा) दोन मृतांची नावे आहेत.
मोताळा तालुक्यातील पुन्हई गावशिवारात ही घटना रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली असून रामदास आणि मंगेश हे ट्रॅक्टरमधून पोलची वाहतूक करत होते.
पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवली आहेत.

Previous articleBREAKING NEWS चिखली देऊळगाव राजा रोडवर भीषण अपघात अपघातात दोन जागेवर ठार एक जखमी,अंढेरा पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल….
Next articleद्विज गादेवाड ने राष्ट्रीय तायक्वॉदो स्पर्धेत सुवर्ण पदक पटकवला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.