Home जालना मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जालना जिल्हा बंदला जाफ्राबादेत उस्फुर्त प्रतिसाद..

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जालना जिल्हा बंदला जाफ्राबादेत उस्फुर्त प्रतिसाद..

144

आशाताई बच्छाव

1000771939.jpg

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जालना जिल्हा बंदला जाफ्राबादेत उस्फुर्त प्रतिसाद…

तालुका प्रतिनिधी जाफ्राबाद -मुरलीधर डहाके
दिनांक 22/09/2024
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती या बंदला जाफ्राबाद तालुक्यातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठान दुकाने बंद ठेवून उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
यावेळी मराठा आंदोलकांनी सरकारला इशारा दिला आहे की मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे गेल्या १३ महिन्यापासून आंदोलन करीत आहे आणि त्यांनी १३ महिन्यात पाच आमरण उपोषण केले आता सध्या त्यांचे सहावे आमरण उपोषण हे सुरू असून त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे त्यांची त्यांची प्रकृती खालावली असून सरकार मात्र झोपेचे सोंग घेत आहे असा आरोप मराठा समाजाने केला आहे तरी राज्य सरकारने तात्काळ मराठा आरक्षण सदर्भातील
निर्णय घ्यावा सगे सोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे व मराठा समाजाचा हैदराबाद गॅझेट सातारा संस्थान गॅझेट बॉम्बे गॅझेट घेऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट ओबीसीचे आरक्षण देऊन न्याय द्यावा व मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे घ्यावे अशी मागणी यावेळी मराठा समाज बांधवांनी केली आहे…
यावेळी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते ….

Previous articleमराठा आरक्षणासंदर्भात 24 सप्टेंबर मंगळवार रोजी वसमत बंदची हाक.
Next articleमुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या पुढाकाराने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन टेस्ट सिरीज चे वितरण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.