आशाताई बच्छाव
मुक्रमाबादेत २२ सप्टेंबर ला ‘सैराट’ फेम आर्ची येणार..
मुक्रमाबाद प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील अखिल भारतीय होलार समाज संघटनेतर्फे २२ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत मुक्रमाबाद येथील मैदानावर होलार समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला ‘सैराट’ फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू या सिनेअभिनेत्रीची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय होलार समाजाचे अध्यक्ष प्रा. वैजनाथ सुरनर राहतील. कार्यक्रमाचे उद्घाटन व्यंकटराव गोजेगावकर करतील तर प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी खतगावकर उपस्थित राहतील. या मेळाव्याला अशोक रावीकर, हैदर केंगार, माधवराव होनमाने यांचीही उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन श्रीकांत काळे व अण्णासाहेब जाहीरे यांनी केले आहे






