Home उतर महाराष्ट्र आज सोनई, जगदंबा मातेच्या भव्य दिव्य प्रंगणामध्ये सीता स्वयंवर संपन्न”

आज सोनई, जगदंबा मातेच्या भव्य दिव्य प्रंगणामध्ये सीता स्वयंवर संपन्न”

212

आशाताई बच्छाव

1000768769.jpg

सोनंई, नेवासा कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी आज सोनई, जगदंबा मातेच्या भव्य दिव्य प्रंगणामध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती महोत्सवा निमित्ताने महंत ह.भ.प. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांचे मार्गदर्शनाखाली व मा.आमदार शंकररावजी गडाख साहेब यांच्या संकल्पनेतून रामायणाचार्य ह.भ.प.रामरावजी महाराज ढोक यांचे सुश्राव्य वाणीतून तुलसी रामायण कथेच्या तिसऱ्या दिवशी “सीता स्वयंवर” हा भाग संपन्न झाला.
तिसऱ्या दिवशीही तेवढ्याच उत्साहाने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून भावीक भक्तांनी रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम चा जयघोष करत या कथेचा आनंद द्विगुणित केला…
आजच्या तिसऱ्या दिवशीच्या कथेनंतर महाआरती मा उदयनदादा गडाख यांनी सपत्नीक तसेच परिसरातील २१ जोड्यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.
यावेळी सोनईसह नेवासे तालुक्यातील भाविक भक्त हजारोंच्या संख्येने कथेप्रसंगी उपस्थित राहून सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला…

Previous articleमुक्रमाबादेत २२ सप्टेंबर ला ‘सैराट’ फेम आर्ची येणार
Next articleसार्वजनिक बांधकाम विभागाचा गंलथान कारभार ऑपे चालकावर बेतला….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.