आशाताई बच्छाव
प्रदेश काँग्रेसचे सहप्रभारी चौधरी रविवारी जालना जिल्हाच्या दौऱ्यावर
———————————————-
जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) – जालना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा राज्याचे सहप्रभारी माननीय श्री कुणालजी चौधरी हे दि. 22 सप्टेंबर 2024 रविवार रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून जिल्ह्यातील विधानसभेच्या पूर्व तयारीसाठी मार्गदर्शन करणार आहेत. प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी नामदेवराव पवार यांच्या अध्यक्षते खाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह दिपक हास्पिटल समोर जुना जालना येथे रविवार रोजी दुपारी 3 : 00 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी खासदार डॉ. कल्याणराव काळे, आमदार कैलाश गोरंट्याल , आमदार राजेश राठोड, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया , समन्वयक डॉ. जितेंद्र देहाडे, शेख फरीद , आर आर खडके , प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे , एड. राम कुराडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत , या बैठकीला जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी सर्व तालुकाध्यक्ष सर्व आघाडीचे जिल्हा अध्यक्ष, विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, माजी जि.प.प.स. , न.प. सदस्य आणि सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जालना जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख , शहर जिल्हा काँगेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष शेख मेहमूद ,राजेंद्र राख, वसंत जाधव , विजय चौधरी , गणेश राऊत , राम सावंत , वैभव उगले यांनी केले आहे.