Home बुलढाणा जयस्तंभ चौकात तणावाचे वातावरण…प्रदेश युवक काँग्रेसचे होणारे आंदोलन थांबले…

जयस्तंभ चौकात तणावाचे वातावरण…प्रदेश युवक काँग्रेसचे होणारे आंदोलन थांबले…

20
0

आशाताई बच्छाव

1000765721.jpg

जयस्तंभ चौकात तणावाचे वातावरण…प्रदेश युवक काँग्रेसचे होणारे आंदोलन थांबले…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा:- बुलढाणा गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा शहरात शिवसेना शिंदे गट व काँग्रेस पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप आणि आंदोलनाचा वॉर सुरू आहे. थांबण्याचे काही नाव घेत नाही. काल मुख्यमंत्री बुलढाणातून रवाना झाले आणि आज काँग्रेसने केलेले आंदोलन आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांनी उधळून लावले.
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर मंत्र्यांचे उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती. दरम्यान कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती. दरम्यान आज काँग्रेसने दुपारी आमदार संजय गायकवाड यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी गांधी भवन येथे आंदोलन आयोजित केले होते मात्र काँग्रेसच्या या आंदोलनाला आमदार गायकवाड यांच्या समर्थकांनी उधळून लावले बुलढाणा शहरातील ज्येष्ठ चौकात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांचा मोठा फौज फाटा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here