Home महाराष्ट्र कामगार नेते दादा सामंत यांचे निधन

कामगार नेते दादा सामंत यांचे निधन

197

*⭕मुंबई – कामगार नेते दादा सामंत यांचे निधन* ⭕
( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई–कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष व जेष्ठ कामगार नेते दादा सामंत (९१)यांचे आज सकाळी बोरिवली ( पूर्व )अभिनव नगर सोसायटीतील त्यांची मोठी कन्या गीता प्रभू यांच्या निवासस्थानी वृद्धपकाळाने निधन झाले.प्रसिद्ध कामगार नेते दिवंगत डॉ.दत्ता सामंत यांचे ते मोठे बंधू होते.

त्यांच्या मागे पत्नी प्रमोदिनी तीन विवाहित कन्या गीता,नीता व रुता,जावई व नातवंडे असा परिवार आहे.राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ते सासरे होते.तर कामगार आघाडीचे अध्यक्ष भूषण सामंत यांचे ते काका होते.

दिवंगत डॉ.दत्ता सामंत यांच्या १६ जानेवारी १९९७ साली झालेल्या निर्घृण हत्त्येनंतर १८ जानेवारी १९९७ ते ९ मे २०११ पर्यंत ते कामगार आघाडीचे व संलग्न युनियनचे अध्यक्ष होते.१९८१ च्या गिरणी संपानंतर त्यांनी ग्वाल्हेर येथील गिरणी मधील चांगली नोकरी सोडून ते दत्ता सामंत यांच्या बरोबर युनियन मध्ये सक्रीय झाले.कामगार कायद्यावर त्यांचा चांगला अभ्यास होता.
———————-

Previous articleमीठाच्या पाण्याच्या गुळण्या करा, कोरोनाला दूर ठेवा! ⭕
Next articleपुणे आता आणखी खुलं होणार, पोलिसांनी ९७ टक्के रस्त्यावरील बंदोबस्त हटवला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.