Home बुलढाणा ये क्या हो रहा है?’ सरपंच पुत्राचा ग्रामपंचायतमध्ये 1 लाख 35 हजारांचा...

ये क्या हो रहा है?’ सरपंच पुत्राचा ग्रामपंचायतमध्ये 1 लाख 35 हजारांचा अपहार ! – ग्रामपंचायत सदस्याची गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार ! -म्हणाल्या.. सरपंचांना पायउतार करावे

20
0

आशाताई बच्छाव

1000749869.jpg

‘ये क्या हो रहा है?’ सरपंच पुत्राचा ग्रामपंचायतमध्ये 1 लाख 35 हजारांचा अपहार ! – ग्रामपंचायत सदस्याची गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार ! -म्हणाल्या.. सरपंचांना पायउतार करावे

!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा मोताळा तालुक्यातील पुन्हई ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या फंडातून चक्क एक लाख पस्तीस हजार (135000) रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यात वळवण्याचा
प्रताप सरपंच पुत्राने केल्याचा आरोप सदस्याकडून करण्यात आला आहे. या सरपंच पुत्राची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच सरपंच यांना पदावरून पायउतार करण्यात यावे अशा आशयाची तक्रार ग्रामपंचायत सदस्या वंदना प्रकाश सुरडकर यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
पुन्हई रिधोरा गट ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीमध्ये एकूण 9 सदस्यांची संख्या आहे. सदर ग्रामपंचायतच्या सरपंच ह्या ताईबाई अरुण सावंग आहेत. सरपंच यांचे पुत्र अमोल सावंग यांनी कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याला विश्वासात न घेता ग्रामपंचायत 15 वा वित्त आयोग फंडातून चक्क 1
लाख 35 हजार रुपये एवढी रक्कम स्वतःच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले असून त्याच्या स्वतःच्या घरगुती कामासाठी वापर करत अपहार केला आहे. सदर सरपंच पुत्राचे बँक खात्याचे विवरण ग्रामपंचायत सदस्य वंदना प्रकाश सुरळकर यांच्याकडे आहे. तसेच सरपंच पुत्र अमोल सावंग याच्या नावे महाराष्ट्र शासनाच्या जागेचा 8 अ सुद्धा आहे. त्यामुळे सरपंच व सरपंच पुत्र यांची चौकशी करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करून सरपंच यांना पदावरून पायउतार करण्यात यावे अन्यथा मला नाईलाजाने उपोषणास बसावे लागेल असा इशारा यावेळी तक्रारी मधून ग्रामपंचायत सदस्या वंदना सुरडकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिला आहे.

Previous articleब्रेकिंग! ‘गुलालबंदी’चा जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल! ‘गूलाला’ वरील कारवाईने विक्रेते ‘लालेलाल!’
Next articleग्रामसेवक व बिडीओं वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ! -भाऊ भोजने यांची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here