आशाताई बच्छाव
राष्ट्रीय हिंदी विद्यालयाची विद्यार्थिंनी श्रेया वाजे चित्रकला स्पर्धेत जिल्ह्यातुन प्रथम
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक.१४/०९/२०२४
जालना शहरातील राष्ट्रीय हिंदी विद्यालयाच्या
वर्ग आठवीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी श्रेया पांडूरंग वाजे हिने गणपती
नेत्रालय,जालना मार्फत आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये इयत्ता
आठवी ते दहावीच्या गटातून जालना जिल्ह्यातून सर्वप्रथम क्रमांक पटकावला
आहे. गणपती नेत्रालयामार्फत आयोजित बक्षीस वितरण समारंभात तिचे
मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र,ट्रॉफी देऊन पालकांसह सन्मानित करण्यात
आले.
या यशाबद्दल तिचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर,समर्थ शिक्षण
प्रसारक मंडळ उपाध्यक्ष प्रा.राम कदम,सचिव बिजू वाघमारे, संचालक रामचंद्र
चौधरी,हरिहर शिंदे,नंदकुमार जाधव,शोभाताई अंबेकर, अश्विन अंबेकर,
मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाढवे,प्रा.डॉ.सुहास सदाव्रते, आर.आर.
जोशी,राजेभाऊ मगर, राष्ट्रीय हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनीष
अग्रवाल, उपमुख्याध्यापक गिरीश दशरथ, श्रेयाचे वर्गशिक्षक
नागोरी,कलाशिक्षक ठोंबरे,जेथलिया,गाडेकर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक,
गायत्री नगर मधील रहिवाशी आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
०००००००००००००
फोटो ओळी…..
१०- राष्ट्रीय हिंदी विद्यालयाच्या वर्ग आठवीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी
श्रेया पांडूरंग वाजे हिने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये इयत्ता
आठवी ते दहावीच्या गटातून जालना जिल्ह्यातून सर्वप्रथम क्रमांक पटकावला
आहे. त्याबद्दल तिचे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र,ट्रॉफी देऊन
पालकांसह सन्मानित करण्यात आले.