Home बुलढाणा युवा मराठा’ च्या वृत्तानंतर त्या डांबरी रस्त्याची मुरूम टाकून मलमपट्टी ! -नागरिक...

युवा मराठा’ च्या वृत्तानंतर त्या डांबरी रस्त्याची मुरूम टाकून मलमपट्टी ! -नागरिक म्हणतात.. नव्याने डांबरी रस्ता करा !

27
0

आशाताई बच्छाव

1000746345.jpg

‘ युवा मराठा’ च्या वृत्तानंतर त्या डांबरी रस्त्याची मुरूम टाकून मलमपट्टी ! -नागरिक म्हणतात.. नव्याने डांबरी रस्ता करा !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :-बुलढाणा ‘खड्डेमय रस्त्याच्या समस्येतून बुलढाणेकरांना सोडविणार कोण?’ ही बातमी उमटताच यंत्रणेने त्रिशरण चौक ते खामगाव फाट्यापर्यंतच्या खड्डेमय डांबरी रस्त्यावरील खड्यात
मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली आहे. परंतु येथील वाहनधारक व नागरिकांनी पक्क्या डांबरी रस्त्याची मागणी रेटून धरली असून धडाकेबाज आंदोलनाचा इशारा दिलाय.
‘पावसाळा, खड्डे आणि बुलढाणेकर हे त्रिकूट प्रशासकीय यंत्रणेने तयार केले आहे. यातून बुलढाणेकरांना सोडवण्याची जबाबदारी कोणीच घेताना दिसत नाही’ असा रोखठोक सवाल ‘ युवा मराठा’ने उपस्थित केला होता. त्रिशरण चौक ते खामगाव फाट्यापर्यंतचा खड्डेमय डांबरी रस्ता मरणयातना भोगत असून, रस्त्यावरून जाणारे वाहनधारक व नागरिक बेहाल होत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. दरम्यान यंत्रणेने नागरिकांचा
संताप पाहता रस्त्यांवरील खड्डे मुरूम टाकून बुजविले आहे. हा नेहमीप्रमाणेचा मलमपट्टीचा उपाय अनेकांच्या पचनी पडला नाही. जेव्हा ठेकेदार रस्ता बांधकाम करतो. तेव्हा त्या रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारावर असते. असा करारच असतो. परंतु कमिशनराजमुळे आजकाल रस्ते टिकत नाहीत. कमिशनमुळे रस्त्याची गुणवत्ता योग्य पद्धतीने तपासल्या जात नाही. परिणामी रस्ते उखडतात.
तात्पुरती मलमपट्टी करून वेळ मारून नेणारी यंत्रणा व लोकप्रतिनिधींनी सदर डांबरी रस्त्याचे गुणवत्तापूर्ण डांबरीकरण करावे अशी मागणी होत असून, मागणी मान्य न झाल्यास येत्या काही दिवसात धडाकेबाज आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Previous articleराष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी निर्मला तायडे यांची नियुक्ती …
Next article१७ वर्षीय मुलीसोबत जबरदस्ती…! शेगावला घेऊन गेला अन् …
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here