Home बुलढाणा राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी निर्मला तायडे यांची नियुक्ती …

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी निर्मला तायडे यांची नियुक्ती …

105

आशाताई बच्छाव

1000746328.jpg

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी निर्मला तायडे यांची नियुक्ती …
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा तालुक्यातील धाड गावातील सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या निर्मला गणेश तायडे यांची राष्ट्रवादी महिला प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली आहे. महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी एका नियुक्तीपत्राद्वारे ही निवड केली.
निर्मला तायडे या जामठी (धाड)सारख्या ग्रामीण भागात असताना सुद्धा त्यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क ठेवला आहे. गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत त्या एकनिष्ठ असून कार्यरत आहेत. यापूर्वी सुद्धा त्यांच्यावर संघटनात्मक पातळीवर जबाबदारी देण्यात आली असता ती त्यांनी यशस्वीरित्या पार पडली. त्यामुळे आता त्यांच्याकडे राज्याची महिला सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी नियुक्तीपत्र दिले असून पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील माणसापर्यंत पोचविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.आपल्या निवडीचे श्रेय त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ,राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व जिल्ह्यातील नेते आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांना दिले आहे.

Previous articleदुधा ब्रह्मपुरी दर्शनासाठी गेलेला युवक पाण्यात वाहून बेपत्ता.
Next articleयुवा मराठा’ च्या वृत्तानंतर त्या डांबरी रस्त्याची मुरूम टाकून मलमपट्टी ! -नागरिक म्हणतात.. नव्याने डांबरी रस्ता करा !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.