Home जालना राहुल गांधी यांना धमकी दिल्या प्रकरणी काँग्रेस पक्षाचे भाजपा विरोधात जोरदार निदर्शने....

राहुल गांधी यांना धमकी दिल्या प्रकरणी काँग्रेस पक्षाचे भाजपा विरोधात जोरदार निदर्शने. भाजपा व संघी विचारांना काढून टाकू.

26
0

आशाताई बच्छाव

1000744241.jpg

राहुल गांधी यांना धमकी दिल्या प्रकरणी काँग्रेस पक्षाचे भाजपा विरोधात जोरदार निदर्शने.
भाजपा व संघी विचारांना काढून टाकू.

जालना-भाजपचे माजी आमदार तरविंदर सिंग मारवा याने लोकसभा विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आज शुक्रवारी रोजी गांधी चमन जुना जालना येथे जालना शहर व जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध करून जोरदार निदर्शने आंदोलन करून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने या घटना प्रकरणी संपूर्ण राज्यांमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी भाजपा विरोधात आंदोलन पुकारण्यात आले होते. या अनुषंगाने आज शुक्रवार रोजी खासदार डॉ.कल्याणराव काळे व आ.कैलास गोरंट्याल व जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख,जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने आंदोलन करण्यात आले.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी भाजपा आणि संघी विचाराच्या विरोधात घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी आमदार कैलास गोरंट्याल यांनी निषेध व्यक्त करताना सांगितले की,खासदार राहुल गांधी यांना भाजप नेत्यापासून धोका निर्माण झालेला आहे.काँग्रेस पक्ष अशा धमक्यांना बिलकुल घाबरत नाही. केंद्र शासनाने खासदार राहुल गांधी यांच्या सुरक्षे मध्ये वाढ करून त्यांना अधिक सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद म्हणाले की,काँग्रेस पक्षाचे नेत्या स्व.इंदिरा गांधी,स्व. राजीव गांधी यांनी देशाच्या एकता व अखंडतेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. हा इतिहास जनता विसरू शकणार नाही.

Previous articleपरळीत रेल्वे रुळाजवळ तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ!
Next articleकवयित्री शिल्पा देशपांडे यांना ११ हजारांचा पुरस्कार जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here