Home बीड परळीत रेल्वे रुळाजवळ तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ!

परळीत रेल्वे रुळाजवळ तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ!

127

आशाताई बच्छाव

1000744236.jpg

परळीत रेल्वे रुळाजवळ तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ!

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी  परळी शहरातील राणी लक्ष्मी टावर चौक परिसरातील मथुरा मल्टी सर्विसेस चे मालक सचिन पोखरकर वय ४० वर्षे यांचा गुरुवारी रात्री ११:०० वाजेच्या सुमारास परळी – गंगाखेड मार्गावरील रेल्वे रुळावर सिमेंट फॅक्टरी परिसरात मृतदेह आढळून आला. या परिसरात त्यांची मोटारसायकलही दिसून आली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप करू शकले नाही. मात्र सचिन पोखरकर यांनी आत्महत्या केली की काही घातपात झाला याविषयी सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास परळी ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रमेश तोटेवाड, जमादार पवार व वाहन चालक मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला असून सदरील घटनेमुळे सर्व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तरी पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस हे करीत आहेत.