आशाताई बच्छाव
स्थानिक गुन्हे शाखेचा टाकळी शिवारात हातभट्टीवर छापा
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाळीसगाव शहराला लागून असलेल्या टाकळी प्र.चा.शिवारात गावठी हातभट्टीवर छापा टाकून सुमारे 34 हजार 750 रूपये किंमतीचे गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन तसेच तयार दारू असा ऐवज जप्त केला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला हातभट्टी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टाकळी प्र.चा. शिवारात नाल्याच्या काठावर संशयित संदीप अण्णा पवार हा गावठी हातभट्ठीची दारू तयार करीत असल्याची माहिती स्थनिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांच्या आदेशानुसार हवालदार सुधाकर अंभोरे, मुरलीधर धनगर, पोना. राहूल पाटील, पोकॉ. सागर पाटील, भूषण शेलार यांच्या पथकाने 9 रोजी दुपारी छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याची साधने, 900 लिटर कच्चे रसायन, 50 लिटर उकळते रसायन व 315 लिटर तयार गावठी दारू असा सुमारे 34 हजार 750 रूपये किंमतीचा ऐवज जप्त केला
या प्रकरणी पोना. राहूल पाटील यांच्या फिर्यादीवरून संदीप पवार याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र प्रोव्हीजन कायदा कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.