आशाताई बच्छाव
सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्थेत बाधा निर्माण करणाऱ्या विरुद्ध पोलीस कडक कारवाई करणार …विभागीय पोलीस अधिकारी डॉ .गणपत दराडे
धार्मिक कार्यक्रम शांततेत पार पडावेत… पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे
तालुका प्रतिनिधी जाफराबाद- मुरलीधर डहाके
दिनांक 06/09/2024
जाफ्राबाद पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न…..
सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्थेत बाधा निर्माण करणाऱ्या विरुद्ध पोलीस कडक कारवाई करणार असून,त्या अनुषंगाने पोलीस तशा सूचना कारवाई करत आहे.गणेशोत्सव साजरा करताना इतर समाजाच्या भावना न दुखावता आपला सण आनंदाने साजरा करा, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मिरवणूक डीजे, मुक्त व्यसन मुक्त असली पाहिजे यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन उप विभागीय पोलीस अधिकारी गणपत दराडे यांनी केले आहे.
जाफ्राबाद पोलीस ठाण्यात तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आयोजित केलेल्या पदाधिकारी, व बैठकीत केले.गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था चोख रहावी, धार्मिक कार्यक्रम शांततेत पार पडावेत, यासाठी सार्वजानिक गणेशोत्सवाचे पदाधिकारी,शांतता समितीचे सदस्य व प्रतिष्ठित नागरिक यांच्या बैठकीचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते त्या प्रसंगी ते बोलत होते.
शांतता बैठकीचे प्रस्ताविक पोलीस निरीक्षक इंगळे यांनी केले. यावेळी शांतता समितीचे सदस्य व प्रतिष्ठित लोकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक पोउपनि वसुदेव पवार, पोउपनि सखाहरी तायडे, प्रकाश पठाडे, महेश वैद्य ,सुभाष जायभाये, प्रभाकर डोईफोडे, आनंदा भुतेकर, आनंद डोईफोडे, संदीप भागिले, अनिल डुरे, विश्वनाथ ठाकरे, संदीप गवई, स्वाती पंडित,यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व सर्व पक्षाचे नेते व पत्रकार व शांतता समितीचे सदस्य व तालुक्यातील सर्वच गणेश मंडळाचे अध्यक्ष व सदस्य, सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते.