आशाताई बच्छाव
पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करणारा आरोपी जेरबंद 18 वर्षापासून होता फरार … तालुका प्रतिनिधी जाफराबाद- मुरलीधर डहाके..06/09/2024… भोकरदन न्यायालय अंतर्गत केस क्रमांक आरपीसी ७७/२००७ पोलीस ठाणे भोकरदन गुरनं १५९/२००६ कलम व ईतर भादवी मधील आरोपी नामे अमजद अमजद खां अयूबखां पठान वय ४० वर्षे रा. कठोरा बाजार हा तत्कालीन उपनिरीक्षक बंगले साहेब यांचेवर प्राण घातक हल्ला करुण फरार झाला होता.गुन्हा घडले पासून १८ वर्ष पासून फरार झाला होता. सदर आरोपी याचे मागावर गुप्त बातमीदार नेमून वेळोवेळी महिती घेतली असता आज रोजी ६ सप्टेंबर २०२४ रोजी १८ वर्ष पासून फरार असलेला आरोपी हा गावात आल्याचे समजताच स. फौजदार ३३ राऊत व पोकाँ.१६४४ राणगोते यांनी मोठ्या शिताफीने सदर आरोपी यास ताब्यात घेऊन पोलिसस्टेशनला हजर करून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास आज रोजी मा. न्यायालयात हजर केले असून सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेमानी मा. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. गणपत दराडे , पोलीस निरीक्षक किरण बुडवे , यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.