आशाताई बच्छाव
लालवाडी तालुका अंबड येथील स्मशानभूमीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सरकारच्या प्रतीकात्मक अंत्ययात्रा आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न
प्रतिनिधी :
आज दिनांक 26 ऑगस्ट सोमवार रोजी मौजे लालवाडी तालुका अंबड येथील स्मशानभूमीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकारच्या प्रतीकात्मक अंत्ययात्रा आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला . स्वातंत्र्याची 78 वर्षे होऊन सुद्धा लालवाडी गावामध्ये अद्याप हिंदू व बौद्ध समाजाची स्मशानभूमी नाही यामुळे गावकऱ्यांना मोठ्या त्रासाला सहन करावा लागत आहे अशी भावना गावकऱ्यांनी व आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सावळा हरी शिंदे प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष प्रदीप शिंदे, सुदाम इंगोले, जगन्नाथ ठाकूर ,सुनील पंडित, सिद्धेश्वर वरगणे , पंढरी मस्के, लखन शिंदे, लखन शिंदे ,करण चव्हाण ,भाऊसाहेब शिंदे ,कारभारी पवार ,कृष्णा शिंदे, अफरोज शहा तुकाराम जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. छायाचित्र किरण खानापुरे