Home जालना जालन्यात गजकेसरी स्टील कंपनीत भिषण स्फोट २२ कामगार जखमी: ३ गंभीर, भीषण...

जालन्यात गजकेसरी स्टील कंपनीत भिषण स्फोट २२ कामगार जखमी: ३ गंभीर, भीषण स्फोट हा कंपनीचा हलगर्जीपणा की दुर्घटना ?

333
0

आशाताई बच्छाव

1000674671.jpg

जालन्यात गजकेसरी स्टील कंपनीत भिषण स्फोट २२ कामगार जखमी: ३ गंभीर, भीषण स्फोट हा कंपनीचा हलगर्जीपणा की दुर्घटना ?
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक २४/०८/२०२४
स्टील कंपनीत लोखंड वितळणाऱ्या भट्टीमध्ये विस्फोट झाल्याने वितळलेले लोखंड अंगावर पडून 22 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेतील जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जालना औद्योगिक वसाहती मधील गजकेसरी स्टील कंपनीमध्ये भिषण स्फोट झाला असून या दुर्घटनेत 22 जण जखमी झाले आहेत. यामधील तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. स्टील कंपनीत लोखंड वितळणाऱ्या भट्टीमध्ये स्फोट झाल्याने वितळलेले लोखंड अंगावर पडून 22 जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेतील जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटना घडताच कंपनीला बंद करून आत मध्ये काम करणाऱ्या कामगारांचे मोबाईल हिसकावण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल ,अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी चंदन झीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलिसांनी धाव घेऊन घटनेची चौकशी सुरू केली आहे. जालना औद्योगिक वसाहतीत नेहमी किरकोळ घटना घडत असतात याची माहिती लपविली जाते तसेच पोलीसही माहिती देण्यास टाळाटात करतात, अशी तक्रार काही स्थानिक लोकांनी केली आहे.
जालना औद्योगिक वसाहती मधील गजकेसरी स्टील कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. स्टील कंपनीत लोखंड वितळणाऱ्या भट्टीमध्ये विस्फोट झाल्याने वितळलेले लोखंड कामगारांच्या अंगावर पडले यास दुर्घटनेत 22 जण जखमी झाले आहेत दुर्घटनेतील जखमेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसासह बचाव पथकाने धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले दुर्घटनेत बावीस कामगार जखमी झाली असून यापैकी तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत.घटनास्थळासह रुग्णालयात पोलीस दाखल झाले असून जबाब नोंद करण्याचे काम सुरू असल्याची माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली आहे.
गजकेसरी स्टील कंपनीत लोखंड वितळणाऱ्या भट्टीमध्ये झालेला विस्फोट हा गजकेसरी स्टील कंपनीचा हलगर्जीपणा की दुर्घटना याचा शोध घेणे गरजेचे आहे. कारण या कंपनीत किती कामगार काम करतात त्या कामगारांची नोंद आहे का ?त्या कामगारांना सुरक्षा कीट दिले होते का ?कायदेशीर रित्या कंपनीतील कामगारांचा विमा काढणे बंधनकारक असताना अनेक कामगार विना नोंद करताच कंपनीत काम करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने कामगारांच्या जीवनाशी अशी खेळी खेळल्या जात असल्याचे निष्पन्न होत आहे.
लवकरच या घटनेची सविस्तर चौकशी करून केवळ पैसा कमावण्यासाठी जालना औद्योगिक वसाहतीत अनेक स्टील कंपनीचे मालक कामगारांचा जीव कसा धोक्यात घालतात याची सविस्तरपणे चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Previous articleसोनई महाविद्यालयात राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा .
Next articleतेली समाज प्रमुख पदाधिकारी यांची नियोजनात्मक बैठक संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here