आशाताई बच्छाव
परळी वैजनाथ येथील कृषी महोत्सव कार्यक्रमानिमित्त शेतकरी गट सातेफळ येथील स्टॉलला कृषिमंत्री मुंडे यांची भेट
हिंगोली ,(श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ )- परळी वैजनाथ येथे बुधवारपासून सुरू असलेला कृषी महोत्सव राज्यस्तरीय कार्यक्रम सुरू असून बुधवार रोजी सायंकाळी उशिरापर्यंत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री यांनी अनेक शेतकरी स्टॉलवर भेटीगाठी देऊन शेतकऱ्यांशी चर्चा व संवाद केला अशाच वेळेस कृषी विभाग हिंगोली जिल्ह्यातील वसमत कृषी विभागाअंतर्गत असलेल्या सोमनाथ सेंद्रिय शेतकरी स्वयंसहायता बचत गट सातेफळ तालुका वसमत जिल्हा हिंगोली. या शेतकरी बचत गटाने उत्पादित केलेल्या 20 मुक्त अन्नधान्य भरड धान्य कडधान्य हळद पावडर मसाले आधी स्टॉल क्रमांक 44 या ठिकाणी उभारण्यात आला होता यावेळेस महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी स्टॉलला भेट देऊन चर्चा व हळद पावडर गुळ मसाले खरेदी केली त्यावेळेस शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष श्रीहरी अंभोरे पाटील यांच्याशी चर्चा करताना टिपलेले छायाचित्र