Home जालना बदलापूर घटनेप्रकरणी आरोपीस तात्काळ फाशी द्यावी! गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा...

बदलापूर घटनेप्रकरणी आरोपीस तात्काळ फाशी द्यावी! गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा तडका-फडकी राजीनामा द्यावा-रेखा तौर

27
0

आशाताई बच्छाव

1000672000.jpg

बदलापूर घटनेप्रकरणी आरोपीस तात्काळ फाशी द्यावी!
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा तडका-फडकी राजीनामा द्यावा-रेखा तौर
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ: बदलापूर येथील त्या घटनेमुळे संपूर्ण देशाची मान शरमेने खाली गेली असून या प्रकरणी आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला हवा, तरच या घटनेबद्दल सरकारलाही थोडी फार का होईना आस्था आहे, असे वाटेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस असंघटीत कामगार आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखा तौर यांनी म्हटले आहे.
संघटनेच्या वतीने काल गांधी चमन येथे निषेध व्यक्त करुन निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस असंघटीत कामगार आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखा तौर, लता जोशी,  रेणुका सोनोने, पलवी महाले, निता वझरकर, कविता दाभाडे, मनकर्णा डांगे, गंगाबाई काळे, राजेंद्र जाधव, मुन्ना दायमा,  अशोक काळे, लक्ष्मी वाघ आदींसह महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
पुढे बोलतांना सौ. तौर म्हणाल्या की, बदलापूर येथील घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे. महिलांवर होणार्‍या लैंगिक छळ, बलात्कार, हत्याप्रकरणी आरोपी विरुद्ध योग्य ती कडक कार्यवाही करावी तसेच महिलांना योग्य ते संरक्षण देण्यात यावे,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असे सांगून सौ. तौर पुढे म्हणाल्या की, बदलापूर शहरातील आदर्श विद्यालयात दोन चिमुकल्यांवर सफाई कर्मचार्‍याकडून झालेल्या अत्याचाराच्या क्रूर अमानुष घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) महिला कमिटीतर्फे गुरुवारी सकाळी गांधी चमन येथे आंदोलन करण्यात आले. गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून अशा निष्क्रिय माणसाने खरे तर स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे, लवकरात लवकर गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यायलाच पाहिजे, अशी मागणीही यावेळी सौ. तौर यांनी केेली.

Previous articleनागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी आपले सरकार पोर्टल प्रभावीपणे पध्दतीने राबवा- जिल्हाधिकारी
Next articleशासनाकडून जर्मनी देशात  वाहनचालक होण्याची सुवर्णसंधी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here