Home बुलढाणा युवा मराठा ब्रेकिंग न्यूज रविकांत तुपकरांना मुंबईतील मरीन ड्राईव्हवर अटक…

युवा मराठा ब्रेकिंग न्यूज रविकांत तुपकरांना मुंबईतील मरीन ड्राईव्हवर अटक…

97

आशाताई बच्छाव

1000670730.jpg

युवा मराठा ब्रेकिंग न्यूज

रविकांत तुपकरांना मुंबईतील मरीन ड्राईव्हवर अटक…

तरीही शेतकऱ्यांनी गिरगाव चौपाटीवर केले शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक आंदोलन…
युवा मराठा न्यूज बुलडाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-रविकांत तुपकरांनी शेतकरी कर्जमुक्ती, हक्काचा पिकविमा, सोयाबीन-कापूस दरवाढ यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनासाठी जात असतांना मरीन ड्राईव्ह परिसरात अटक केली. रविकात तुपकरांना अटक जरी केली असली तरी शेतकऱ्यांना मात्र गिरगाव चौपाटीवर शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक करून आंदोलन केलेच. सध्या रविकांत तुपकरांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन परिसरात ठेवले असून त्यांना थोड्याच वेळात किल्ला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
मला जरी पोलिसांनी अटक केली असली तरी शेतकऱ्यांचा दाबता येणार नाही. काही दिवसात आपल्या हक्कासाठी संपूर्ण राज्यातील शेतकरी लावकरच रस्त्यावर उतरलेले दिसेल, मग मात्र ते सरकारला जड जाईल, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.