Home जालना बदलापूर अत्याचार प्रकरणी जालन्यात  महिला काॅंग्रेसचे मटका फोड आंदोलन

बदलापूर अत्याचार प्रकरणी जालन्यात  महिला काॅंग्रेसचे मटका फोड आंदोलन

119

आशाताई बच्छाव

1000668953.jpg

बदलापूर अत्याचार प्रकरणी जालन्यात
महिला काॅंग्रेसचे मटका फोड आंदोलन
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)-बदलापूर येथील दोन चिमुरड्यावर झालेल्या अत्याचार व आंदोलकावर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ गुरुवारी ( दि.22) जालना जिल्हा महिला काॅंग्रेस कमिटीतर्फे जालना शहरात मटका फोड आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र  प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,महिला काॅंग्रेसच्या अखिल भारतीय अध्यक्षा अल्का लांबा, महिला काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सौ. संध्याताई सव्वालाखे, जालना जिल्हा काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हा शहराध्यक्ष शेख महेमूद, आमदार कैलास गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्हा महिला काॅंग्रेसच्या अध्यक्षा नंदाताई पवार यांच्या नेतृत्वाखाली गांधी चमन येथे हे मटका फोड आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिमा मटक्याला चिपकूण  हे मटका फोड आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलतांना महिला काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ. नंदा पवार म्हणाल्या की, बदलापूर येथील घटनेचा निषेध केल्या प्रकरणी गृहमंत्र्यांच्या सांगण्या वरून कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले आहे ते गुन्हे लवकरात लवकर माघे घेण्यात यावेत व देशाचा चौथा स्तंभ म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो त्या महिला पत्रकारांचा शिंदे गटाच्या माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या वर शाब्दिक विनयभंग केल्या प्रकरणी  विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे,एका शिक्षकाने पुणे येथे एक्या १३ वर्षाच्या मुलीला दारू पाजून बलात्कार केला, या शिक्षकाला फाशी देण्यात यावी, अकोला येथे अल्पवयीन मुलीवर एका माजोरड्या शिक्षकांनी बलात्कार केला यालातर भर चौकात गोळ्या घालून ठार केले पाहिजे अशीही मागणी करण्यात आली आहे.

Previous articleबदलापूर प्रकरणी काँग्रेस पक्ष आक्रमक : फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा
Next articleसुखी व आनंदी जीवन आपल्याला हवे असेल तर पृथ्वीवर एकच माध्यम आहे ते म्हणजे भगवंत सेवा – बाल कीर्तनकार कु.ईश्वरीताई जावळे.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.