Home जालना परतूर,मंठा विधानसभा मतदारसंघात जरांगे पाटलांच्या नेतृत्वात समाज कार्य करण्यास इच्छुक -कुलदिप बोराडे

परतूर,मंठा विधानसभा मतदारसंघात जरांगे पाटलांच्या नेतृत्वात समाज कार्य करण्यास इच्छुक -कुलदिप बोराडे

117
0

आशाताई बच्छाव

1000667620.jpg

परतूर,मंठा विधानसभा मतदारसंघात
जरांगे पाटलांच्या नेतृत्वात समाज कार्य करण्यास इच्छुक -कुलदिप बोराडे
जालना -वसंतराव देशमुख
दिनांक- 22/08/2024
‌याविषयी सविस्तर माहिती अशी की , दिनांक 20 ऑगस्ट रोजी
संघर्ष योध्दा मा.श्री.मनोजदादा जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या नेतृत्वात यापुढे परतूर-मंठा कार्यक्षेत्रात सामाजिक कार्य करणार असल्याचे प्रतिपादन मंठा येथील धडाडीचे, तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ता, तसेच मंठा,परतुर विधानसभा मतदारसंघातील उभरतं नेतृत्व मा.कुलदिप शामराव बोराडे यांनी केलं आहे.
20 ऑगस्ट 2024रोजी संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत मंठा येथील बैठकीत कुलदिप बोराडे यांनी सन 2013 ते आजपर्यंत केलेल्या अनेक सामाजिक कार्य अहवाल जेष्ठांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आला. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना
श्री. रावसाहेब महाराज खराबे रा.हेलस ता.मंठा जि.जालना, ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज मंदने वारकरी शिक्षण संस्था देवी रोड मंठा,
तालुक्यातील शेतकरी,कामगार, नोकरदार, विद्यार्थी
जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुलदीप बोराडे यांनी आपल्या मनातील भावना पोहचविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. माझ्यासाठी आपण जो आदेश द्याल, तो मला शिरसावंद्य आहे व असेल.असा विश्वास त्यांनी संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांना यावेळी दिला
आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून माझ्या कार्य अहवालाचे अवलोकन करावे. ज्यामुळे मला आपल्यासोबत काम करण्याची प्रेरणा मिळेल तसेच भविष्यातही आपल्या विचारांना प्रत्यक्षात उतरविण्याची संधी मिळेल. आपण माझ्या कार्य अहवालाचे अवलोकन करून आपल्या सोबत यापुढेही कार्य करण्याची संधी उपलब्ध करून द्याल अशी अपेक्षा यावेळी कुलदीप बोराडे यांनी व्यक्त केली आहे.

Previous articleअत्याचाराच्या ” त्या ” घटनांच्या निषेधार्थ जालन्यात काँग्रेस पक्षाचे जोरदार आंदोलन.               
Next articleसाकोली बंद 100 % यशस्वी विविध सामाजिक संघटना व आंबेडकरी पक्षांचा सहभाग
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here