Home बुलढाणा डोंगर खंडाळ्याच्या सरपंचावर १३ विरुद्ध एक ने अविश्वास ठराव पारित,सरपंचाच्या मनमानी कारभाराला...

डोंगर खंडाळ्याच्या सरपंचावर १३ विरुद्ध एक ने अविश्वास ठराव पारित,सरपंचाच्या मनमानी कारभाराला ठपका ठेवत ग्रामपंचायतच्या सदस्यांनी हा अविश्वासदर्शक ठराव केला दाखल…

116

आशाताई बच्छाव

1000665435.jpg

डोंगर खंडाळ्याच्या सरपंचावर १३ विरुद्ध एक ने अविश्वास ठराव पारित,सरपंचाच्या मनमानी कारभाराला ठपका ठेवत ग्रामपंचायतच्या सदस्यांनी हा अविश्वासदर्शक ठराव केला दाखल…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलढाणा डोंगर खंडाळा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच बबन तुलाराम घाडगे यांच्यावरील अविश्वास ठराव २० ऑगस्ट रोजी मंजूर झाला आहे. घाडगे यांच्यावर मनमानी कारभाराचा ठपका ठेवत ग्रामपंचायतीच्यासदस्यांनी हा अविश्वासदर्शक ठराव दाखल केला होता. त्यात सरपंच घाडगे हे मनमानी पद्धतीने ग्रामपंचायतीचा कारभार करतात, सदस्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेत नाहीत व परस्परच निर्णय घेतात, स्वतःच्या मनाने चालवतात. सदस्यांची कुठलीही मते विचारात घेतली जात नाहीत, सदस्यांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही,आदी मुद्द्यांचा समावेश होता.तहसीलदार विठ्ठल कुंमरे,ग्रामविकास अधिकारी डी आर सदावर्ते, सरपंच,उपसरपंच तसेच सदस्य उपस्थीत होते. सभेच्या सुरुवातीला सदस्यांना सरपंचाच्या विरुद्ध ठेवण्यात आलेल्या विषयाची माहिती देण्यात आली. सभेच्या सुरुवातीला उपसरपंच श्याम बळीराम सावळे यांनी सूचक म्हणून सभा घेण्याबाबत सूचित करण्यात आले अनुमोदक म्हणून सदस्य वसंता दासू चव्हाण यांनी अनुमोदन दिले.त्यानंतर अविश्वास ठरावाच्या दिलेल्या नोटिसवर चर्चा करण्यात आली.यावेळी उपसरपंच शाम सावळे यांनी सरपंच विश्वासात घेत नसल्याचे सांगितले. त्यावर सरपंचाने त्यांच्याव केलेले आरोप फेटाळून लावले.त्यानतर हात वर करून मतदान घण्यात आले या वेळी अविश्वास ठरावाच्या बाजूने तेरा सदस्यांनी तर एक सदस्य तटस्थ राहिला.तर स्वता सरपंचाने अविश्वास ठरावाच्या विरुद्ध आपले मत नांदविले. अविश्वास ठरावाच्या बाजूने उपसरपंच श्याम बळीराम सावळे, सदस्य वसंता दासू चव्हाण, सुनील श्रीराम चव्हाण, अनिता गजानन चव्हाण, नीलिमा लक्ष्मण सावळे, दिलीप तेजराव काकडे, महेश मोहन सावळे, स्वाती शिवाजी सावळे, मीना अरुण सावळे, साधना गजानन सावळे, शोभा संतोष इंगळे, प्रज्ञा गुलाबराव कांबळे, गणेश उत्तम पवार या १३ सदस्यांनी आपले मत नोंदविले. तर अविश्वास ठरावाच्या विरुद्ध सरपंच यांनी मत मांडले होते तर भारती ज्ञानेश्वर कुसळकर या तटस्थ राहिल्या.

Previous articleनेवासा – घंटानाद, वीज बिल बहिष्कार आंदोलनाचा ‘आप’चा इशारा
Next articleमुरादपुर येथील वृक्षारोपण फक्त कागदावरच वृक्ष लागवडिच्या प्रतीक्षेत मौजे मुरादपुर ग्रा प चा डिसाळ कारभार पुन्हा ऐकदा चव्हाट्यावर….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.