Home वाशिम व्हॉईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंगच्या कारंजा तालुका अध्यक्षपदी एकनाथ पवार यांची निवड

व्हॉईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंगच्या कारंजा तालुका अध्यक्षपदी एकनाथ पवार यांची निवड

76

आशाताई बच्छाव

1000665422.jpg

व्हॉईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंगच्या कारंजा तालुका अध्यक्षपदी एकनाथ पवार यांची निवड
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- जगात ४१ देशात असलेली व देशात क्रमांक १ वर असलेल्या व्हॉईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंगच्या कारंजा तालुका अध्यक्षपदी कारंजा येथील साप्ताहिक नाथांजली या वृत्तपत्राचे संपादक एकनाथ पवार यांची नियुक्ती करण्यात आली.
बुधवार, २१ ऑगष्ट रोजी व्हॉईस ऑफ मिडीयाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष रोहीत जाधव यांच्या मार्गदर्शनात आणि साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष विनोद तायडे यांच्या हस्ते तसेच जिल्हाध्यक्ष भागवत मापारी, साप्ताहिक विंगचे प्रदेश कार्याध्यक्ष गजानन धामणे, प्रदेश उपाध्यक्ष संदीप पिंपळकर, जेष्ठ मार्गदर्शक संजय कडोळे आदींच्या उपस्थितीत एकनाथ पवार यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. कारंजा येथील रहिवासी एकनाथ पवार हे गेल्या १० वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत असून याव्यतीरिक्त ते वैदर्भिय नाथ समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून गेली सात वर्षापासून नाथ समाजाच्या विविध समस्यांना वाचा फोडत आहेत. त्यांनी याआधी दैनिक सायरनमध्ये कारंजा प्रतिनिधी म्हणून अनेक वर्षे यशस्वीरित्या काम सांभाळले होते. गेल्या पाच वर्षापासून ते नाथांजली या वृत्तपत्राव्दारे मुल्याधारीत पत्रकारीता करत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Previous articleसुप्रिम कोर्टाचा संविधानविरोधी निर्णय त्वरीत रद्द करा – प्रकाश आठवले
Next article४६ ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र कार्यालय बांधकामासाठी निधी मंजूर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.