आशाताई बच्छाव
स्व. राजीव गांधी प्रतिष्टान घ्या वतीने ह.भ.प.ढवळे महाजाना पुरस्कार
पुणे ब्युरो चीफ उमेश पाटील
स्व. राजीव गांधी प्रतिष्टान च्या वतीने भारत रत्न देशाचे मा. पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची ८० वी जयंती साजरी करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश नवले यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्प हार अर्पण करण्यात आला. सदभावना दिन म्हणून साजरा करण्यात आला. राहुल राऊतयांनी सदभावना दिनाची पार्थना केली यावेळी स्वर्गीय राजीव गांधी प्रतिष्ठान च्या वतीने २०२४ चा जीवन गैरव पुरस्कार ह.भ.प. विष्णुदास नामदेव ढवळे महाराज यांना देण्यात आला. हा सन्मान ह.भ.प. बबरुवाहन वाघ महाराज व ह.भ.प. राजेंद्र महराज मोरे आणि ह.भ.प. प्रशांत मौरे महाराज यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला संत तुकाराम महाराज यांची पगडी उपरणे व राजीवगांधी यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला ह्या वेळी शिवाजी महाराज वाघ ह.भ.प. पांडुरंग पवार ह.भ.प. हिरामण देवकर, योगेश जाधव शंकर गायकवाड, संदीप कदम, कार्यक्रमात उपस्थित होते ह.भ.प. ढवळे महाराज म्हणाले स्व. राजीव गांधी यांनी देशातील युवक व युवती साठी व शेतकऱ्यांन साठी भरीव काम केले आहे. स्य, राजीव गांधी यांनी डिजिटल इंडिया आणलेली आहे. संदेश नवले म्हणाले पंचायत राज मजबूत कैले युवकांना मतदानाचा अधिकार दिला व युवकांना कॉम्पुटर व मोबाईल हातात दिला भारतातील संगणक कांती चे जनक राजीवजी गांधी युकांच्या हृदयात मध्ये ठसा उमटला आहे. आभार संदीप जगताप यांनी केले. प्रतिक नवले यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. वारकरी लोकांना स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित अन्नदान करण्यात आले.
संदेश नवले
अध्यक्ष स्व. राजीव गांधी प्रतिष्ठान






