आशाताई बच्छाव
बारलीगा येथील दैनिय रस्त्यांची दुर्दशा ….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
सिंदखेडराजा :-बुलढाणा सिंदखेडराजा तालुक्यातील मौजे बारलिंगा येथील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्याने ये जा करणे अत्यंत कसरतीचे झाले आहे महाविद्यालयीन मुलांना शाळेत दुसरबीड ला जाण्यासाठी याच रस्त्याने जावे लागते त्यांना सुद्धा या रस्त्याने मोठी कसरत करावी लागत आहे या गावाला बसची व्यवस्था नसून प्रायव्हेट गाड्या हा रस्ता खराब झाल्यामुळे बंद आहे आठवडी बाजार दुसरबीड ला जाण्यासाठी गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते तसेच हॉस्पिटलला जाताना सुद्धा खूप त्रास सहन करावा लागत आहे हा रस्ता दीड कि.मी. चा असून सदर रस्ता हा जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे येतोय या विभागाने या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेला आहे तरी याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे नाहीतर येणाऱ्या काळात पुढार्यांना गावबंदी व तसेच येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याच्या मनस्थितीत गावकरी असून याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे