Home बुलढाणा ब्रेकिंग! काँग्रेसमध्ये संजय राठोड यांची लॉटरी लागली?

ब्रेकिंग! काँग्रेसमध्ये संजय राठोड यांची लॉटरी लागली?

36
0

आशाताई बच्छाव

1000661331.jpg

ब्रेकिंग! काँग्रेसमध्ये संजय राठोड यांची लॉटरी लागली?
बुलढाणा :- बुलढाणा विधानसभा निवडणुकीत अनेक जण काँग्रेसमध्ये इच्छुक होते. त्यामध्ये संजय राठोड यांना तिकीट देत येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह राज्याचे वरिष्ठ नेते तथा प्रदेश काँग्रेसचे अनेक पदाधिकारी जिल्हास्तरीय आढावा बैठकीसाठी बुलढाण्यात आले असता, त्यांच्यापुढे बुलढाणा व मोताळा तालुक्यातील हजारो युवक कार्यकर्त्यांनी संजय राठोड यांच्यासाठी
जोरदार शक्तिप्रदर्शन करत बुलढाणा विधानसभेसाठी त्यांना काँग्रेसचे उमेदवारी देण्याची जोरदार मागणी केली होती.

आगामी काळात महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, त्या अनुषंगाने सोमवार 13 ऑगस्ट रोजी बुलडाणा येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चैन्नीथला, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभा विरोधी पक्षनेते, विजय वडेट्टीवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते सतेज पाटील, प्रदेश संघटन प्रभारी नानाभाऊ गावंडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतच संजय राठोड यांना पसंती देण्यातआल्याचे वृत्त हाती आले आहे.

Previous articleचांगल्या आरोग्यासाठी नागरिकांनी शुध्द पाण्याचा वापर करावा – जयश्रीताई जराते यांचे आवाहन
Next articleबारलीगा येथील दैनिय रस्त्यांची दुर्दशा ….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here