Home पुणे पिंपळे गुरव येथील वाहने फोडणाऱ्या सराईत गुंडाची पिंपळे गुरव मधून धिंड काढण्यात...

पिंपळे गुरव येथील वाहने फोडणाऱ्या सराईत गुंडाची पिंपळे गुरव मधून धिंड काढण्यात आली

28
0

आशाताई बच्छाव

1000661300.jpg

पिंपळे गुरव येथील वाहने फोडणाऱ्या सराईत गुंडाची पिंपळे गुरव मधून धिंड काढण्यात आली
पुणे: ब्युरो चीफ उमेश पाटील 
दारू पिऊन रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करणाऱ्या
सराईत गुंडाची सांगवी पोलिसांनी धिंड काढली. सोमवारी (दि. १९) दुपारी पिंपळे गुरव परिसरातून ही धिंड काढण्यात आली. अक्षय राजेश खुडे (२७, रा. राजीव गांधी नगर, पिंपळे गुरव) असे धिंड काढलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय खुडे याने शुक्रवारी (दि. १६) दुपारी रस्त्यावर पार्क केलेल्या चार वाहनांची तोडफोड केली. तसेच, मी अक्षय खुडे आहे, मी इथला भाई आहे असे मोठमोठ्याने ओरडून एका महिलेच्या दिशेने दगड फेकून मारला. नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ पाहणी करण्याच्या बहाण्याने आरोपीला घटनास्थळी चालवत नेले. अशा प्रकारे पोलिसांनी आरोपीची धिंड काढल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तोडफोड प्रकरणातील आरोपीची पिंपळे गुरव मधून धिंड काडली सांगवी पोलीस कर्मचाऱ्यांना चांगला धडा शिकवला आरोपीला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here