Home बुलढाणा कोलकाता येथील ‘त्या’ हत्याकांड प्रकरणी संग्रामपूर येथे डॉक्टरांचे निषेध आंदोलन! कडक कारवाईची...

कोलकाता येथील ‘त्या’ हत्याकांड प्रकरणी संग्रामपूर येथे डॉक्टरांचे निषेध आंदोलन! कडक कारवाईची मागणी

154

आशाताई बच्छाव

1000659423.jpg

कोलकाता येथील ‘त्या’ हत्याकांड प्रकरणी संग्रामपूर येथे डॉक्टरांचे निषेध आंदोलन!
कडक कारवाईची मागणी

ज्ञानेश्वर पाटील युवा मराठा न्यूज ब्युरो चीफ बुलढाणा:
पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील डॉक्टर महिलेची लैंगिक अत्याचार करुन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपींवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी संग्रामपूर तालुक्यातील डॉक्टरांनी केली आहे.
कोलकातामध्ये आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी निषेधार्थ १७ ऑगस्ट रोजी संग्रामपूर तहसील समोर तालुक्यातील डॉक्टरांनी काळ्या फिती लावून तीव्र निषेध व्यक्त करत निषेध आंदोलन केले.आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी महामहिम राष्ट्रपती यांना तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांच्यामार्फत निवेदन देऊन करण्यात आली आहे.
यावेळी संग्रामपूर तालुका नीमा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अमोल धुर्डे,उपाध्यक्ष डॉ.गणेश वानखडे, सचिव डॉ.विवेक देशमुख, कोषाध्यक्ष डॉ.जुगल गांधी, डॉ.हरी अंभोरे, डॉ.गोपाल सूरतकार, डॉ.मनोज तायडे, डॉ.योगेश सपकाळ, डॉ.आशिष हागे, डॉ.दिपक गायकवाड, डॉ.समीर शेख, प्रशांत इंगळे, राहुल गावंडे, विशाल टापरे आदी उपस्थित होते.

Previous articleछत्रपती संभाजी नगर येथे अखिल भारतीय पत्रकार संघची बैठक संपन्न
Next articleकला व वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल येथे प्राणिशास्त्र विभागात अभ्यास मंडळाची स्थापना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.