Home जळगाव चाळीसगाव येथे शिवसेना बैठक संपन्न

चाळीसगाव येथे शिवसेना बैठक संपन्न

108

आशाताई बच्छाव

1000659382.jpg

चाळीसगाव येथे शिवसेना बैठक संपन्न

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी शिवसेना नेते ,राज्यसभा खासदार, दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चाळीसगाव तालुक्यात शिवसैनिक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानिमित्ताने माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे 19 ऑगस्ट रोजी माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील सर्व शिवसैनिकांची बैठक संपन्न झाली या प्रसंगी सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खासदार संजय राऊत यांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन उन्मेश पाटील यांनी केले.
याप्रसंगी शिवसेना नेते मोरसिंग राठोड, तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, शहर प्रमुख नानाभाऊ कुमावत, दिलीप घोरपडे, भिमराव खलाणे यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख, शिवसैनिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Previous articleगडचिरोली येथे लाडक्या बहिणींचा देवाभाऊ कार्यक्रम संपन्न…..
Next articleचाळीसगाव येथे समता सैनिक दल बौद्धिक प्रशिक्षण शिबिर संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.