Home जळगाव चाळीसगाव येथे समता सैनिक दल बौद्धिक प्रशिक्षण शिबिर संपन्न

चाळीसगाव येथे समता सैनिक दल बौद्धिक प्रशिक्षण शिबिर संपन्न

153

आशाताई बच्छाव

1000659396.jpg

चाळीसगाव येथे समता सैनिक दल बौद्धिक प्रशिक्षण शिबिर संपन्न

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी चाळीसगाव येथे समता सैनिक दलाचे एक दिवसीय बौद्धिक प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.
राज्य अध्यक्ष धर्मभुषण बागुल यांनी या प्रसंगी समता सैनिक दल , आंबेडकरी मिशन, राष्ट्रनायक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या आणि त्यांचे तत्त्वज्ञान ,उभी ठाकलेली आव्हाने आणि त्यावर करावयाचे उपाय याबाबत सविस्तर आणि मुद्देसूद मार्गदर्शन केले.
राज्य संघटक विजय निकम, जळगाव जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे पाचोरा यांनी मार्गदर्शन केले.
जळगाव, पाचोरा, भडगाव, धुळे येथील निवडक आणि फक्त प्रमुख 25 कार्यकर्त्यांना या शिबिरात निमंत्रित करण्यात आले होते.
सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत हे शिबिर घेण्यात आले.
यावेळी सचिन गांगुर्डे – जळगाव जिल्हा सचिव, दिनेश ठाकूर – धुळे जिल्हा संपर्कप्रमुख, बाबा पगारे – चाळीसगाव तालुका सचिव यांची नियुक्ती करण्यात आली.
लवकरच धुळे आणि जळगाव येथे जिल्हास्तरीय बैठक व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येईल असे राज्य अध्यक्ष धर्मभूषण बागुल यांनी जाहीर केले.
तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव , तालुका सचिव बाबा पगारे, संपर्क प्रमुख बाजीराव घोडेस्वार, मुख्य शहर प्रचारक विशाल पगारे, तालुका संघटक विष्णू जाधव यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.

Previous articleचाळीसगाव येथे शिवसेना बैठक संपन्न
Next articleछत्रपती संभाजी नगर येथे अखिल भारतीय पत्रकार संघची बैठक संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.