Home नांदेड माजी विद्यार्थी संघाकडून देगलूर महाविद्यालयात वृक्षारोपण.

माजी विद्यार्थी संघाकडून देगलूर महाविद्यालयात वृक्षारोपण.

136

आशाताई बच्छाव

1000654633.jpg

माजी विद्यार्थी संघाकडून देगलूर महाविद्यालयात वृक्षारोपण.

देगलूर तालुका प्रतिनिधी /गजानन शिंदे

देगलूर : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माजी विद्यार्थी संघाच्या वतीने देगलूर महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. माजी विद्यार्थी संघ, देगलूर महाविद्यालय, देगलूरच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन व्हावे म्हणून माजी विद्यार्थी संघाच्या वतीने नारळ आणि बदामाची एकूण १७ झाडे लावण्यात आली.
याप्रसंगी अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर, संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य देवेंद्र बालाजीराव मोतेवार, सूर्यकांत नारलावार, रवींद्र अप्पा द्याडे, विजय पोशट्टी उनग्रतवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ, माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष अँड. मोहसीन अली, सचिव डॉ. सुरेंद्र आलुरकर , उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार , उपप्राचार्य प्रा. उत्तमकुमार कांबळे, माजी विद्यार्थी संघाचे समन्वयक डॉ.राजेश्वर दुडूकनाळे यांच्यासह पर्यवेक्षक श्री संग्राम पाटील कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleप्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत प्रमुख मागण्यासाठी शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण.
Next articleविद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकासाची पायाभरणी शालेय जीवनातच विकसित केली पाहिजे – सर्जेराव मते
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.