Home मुंबई मुंबई दादर नायगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल मोरे यांनी दाखवली माणुसकी

मुंबई दादर नायगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल मोरे यांनी दाखवली माणुसकी

127

आशाताई बच्छाव

1000651074.jpg

मुंबई दादर नायगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल मोरे यांनी दाखवली माणुसकी

मुंबई( संजीव भांबोरे)- दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी शनिवारला दुपारी एक वाजताअचानक दादर येथील नायगाव रस्त्याने जात असताना आम्ही एका संघाच्या पत्ता विचारला असता सामाजिक कार्यकर्ते अनिल मोरे यांनी माणुसकी जपत जवळच असल्याचे सांगितले. व त्यांनी सोबत असलेल्या अकरा व्यक्तींना चाय पिण्याची विनंती केली व त्यानंतर त्यांनी राहण्याची जेवण्याची विचारपूस करून तुमच्याकडे सुविधा नसेल तर मी स्वतः उपलब्ध करून देतो असे सांगितले . जेवण ,राहण्याची, सर्व सुविधा करून परिचय नसताना उपलब्ध करून देत माणुसकीचा परिचय दिला .परंतु आम्ही त्यांना आमची सर्व सुविधा असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कमीत कमी चाय सुद्धा घेऊन जा व माणुसकी या नात्यावर पंधरा मिनिटे चर्चा केली. व तुम्हाला जी मदत लागेल ते मी केव्हाही करण्यास तयार असल्याचे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.यावेळी भंडारा जिल्ह्यातील प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे ,माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, साहित्यिक अमृत बनसोड ,प्राध्यापक रमेश जांगडे,माजी पीएसआय दिलीप वानखेडे, विजय भोवते ,आसित बागडे , शिवदास गजभिये, रोशन जांभुळकर, प्राध्यापक सुरेश खोब्रागडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.