Home बुलढाणा ब्रेकिंग! नाव न घेता आ. संजय गायकवाडांवर हल्लाबोल ! -काँग्रेसचे विजय वडेट्टीवार...

ब्रेकिंग! नाव न घेता आ. संजय गायकवाडांवर हल्लाबोल ! -काँग्रेसचे विजय वडेट्टीवार म्हणाले.. -कमिशनखोरीतून सौंदर्गीकरण ! -दादागिरीने जमिनी बळकावल्या ; फॉर्महाऊस बांधले..

89

आशाताई बच्छाव

1000650283.jpg

ब्रेकिंग! नाव न घेता आ. संजय गायकवाडांवर हल्लाबोल ! -काँग्रेसचे विजय वडेट्टीवार म्हणाले.. -कमिशनखोरीतून सौंदर्गीकरण ! -दादागिरीने जमिनी बळकावल्या ; फॉर्महाऊस बांधले..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- विकासाच्या आणि सौंदर्गीकरणाच्या नावाखाली प्रचंड कमिशनखोरी करून स्वतःच्या नाही तर दुसऱ्याच्या जमिनी बाळकावून दादागिरी करून विकास दाखवित
आहे. सत्तेची मस्ती साठवून लोकांना वेठीस धरल्या जात आहे. हे काम अवघ्या महाराष्ट्रात धोकेबाज आमदार करत असून या ऐतिहासिक भ्रष्टाचाऱ्यांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. हे यश आहे की अपयश ? हे जनतेने सांगावे, असे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला. सध्या आढावा बैठक सुरू आहे. यावेळी ते बोलत होते.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आढावा बैठक होऊ घातली आहे. प्रदेश काँग्रेस प्रभारी चेन्नीथल्ला, नाना पटोले, मुकुल वासनिक यांच्यासह अनेक नेते पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. अकोला- वाशिम बुलढाणाची ही आढावा बैठक
आहे. या बैठकीत विजय वडेट्टीवार यांनी थेट नाव न घेता एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेवर निशाणा साधला. कारण येथे शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड आहेत. त्यांच्या शहर सौंदर्यकरणाला आणि विकास कार्याला विजय वडेट्टीवार यांनी टारगेट केले. ते म्हणाले हे सर्व कमिशन खोरीतून झाले आहे. दादागिरी करून लोकांच्या जमिनी बळकावल्या आहेत. सर्वाधिक कमिशन घेऊन फार्म हाऊस बांधले व तेही दुसऱ्याच्या जागेवर दुसऱ्याची जमीन हडप सुद्धा त्यांनी केली. सध्या हे त्रिकूट सरकार देवेंद्र फडवणीस एकनाथ शिंदे व अजित पवार जनतेला चांगलेच लुटत आहे. हे सरकारच धोकेबाज असल्याचे ते म्हणाले..

Previous articleसिंदखेड राजा तहसील कार्यालय वाऱ्यावर.. ! तहसीलदार यांच्या सह दोन नायब तहसिलदार रजेवर गेल्याने जनतेची कामे खोळंबली.
Next articleत्याने’ ‘तिच्या’ साठी वाटेवर डोळे अंथरले !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.