आशाताई बच्छाव
युवा ग्रामीण पत्रकार संघाची आढावा बैठक संपन्न.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
मुखेड – समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कांसाठी सदैव तत्पर असलेले युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार यांच्या नेतृत्वाखाली रविवार १८ ऑगष्ट २०२४ रोजी हिवरा ता. महागांव येथे होणाऱ्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या अनुषंगाने मुखेड येथील निसर्गशाळा जिजाऊ ज्ञानमंदिर येथे दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी तालुकाध्यक्ष सुरेश जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी पत्रकार मनोज बिरादार ,संग्राम पाटील तांदळीकर , बस्वराज अप्पा वंटगीरे, सुर्यकांत आंदुरे , जनक गायकवाड , श्रीनिवास पेंढारकर , अजीत पवार आदीसह मुखेड तालुक्यातील पत्रकारांची उपस्थिती होती. यावेळी सर्वांनी अधिवेशनासाठी जाण्यासाठीची तयारी दर्शविली व कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला.






