Home नाशिक बागलाण तालुक्याला तिसरा पर्याय म्हणून मीच सक्षम आनंदा मोरे

बागलाण तालुक्याला तिसरा पर्याय म्हणून मीच सक्षम आनंदा मोरे

640

आशाताई बच्छाव

1000649763.jpg

बागलाण तालुक्याला तिसरा पर्याय म्हणून मीच सक्षम आनंदा मोरे

नामपूर प्रतिनिधी वामन शिंदे 

बागलात विधानसभा मतदार संघ आदिवासी प्रवर्गासाठी राखीव असून गेल्या 40 वर्षापासून या मतदारसंघात बोरसे व चव्हाण कुटुंबानेच आलटून पालटून सत्ता मिळवली आहे  जनतेच्या मनात आता तिसरा पर्याय दिसत असून याबाबत संपूर्ण मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर मला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याची   माहिती ज्येष्ठ आदिवासी नेते आनंदा मोरे यांनी दिली आहे
आनंदा मोरे हे  मूळचे महड बहीराणे गावचे असून  उत्तम शेतकरी आहेत चाळीस वर्षापासून तालुक्याच्या सामाजिक राजकीय वर्तुळात सक्रिय आहेत त्यांनी  अनेक वर्ष  गावचे सरपंच पद भोगले आहे यानंतर शासनाच्या विविध शासकीय   समित्यांवर काम उत्तम काम केले आहे मागील पंचवार्षिक ला बाजार समितीच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत आदिवासी गटातून ते प्रचंड मतांनी विजयी झाले होते  बाजार समितीत  शेतकऱ्याच्या हितासाठी ते नेहमी झटले   जिद्द व  चिकाटी आत्मविश्वासाच्या जोरावर आजपर्यंत अनेक सामाजिक लोक उपयोगी समस्या त्यांनी सोडवल्या  आहेत प्रशासनाचा त्यांना अतिशय दांडगा अनुभव असून पंचायत समिती जिल्हा परिषद विधान सभा  मंत्रालय या ठिकाणी सातत्याने जाऊन जनतेच्या समस्या  सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे  आदिवासी ना जातीचे दाखले वन जमिनी रेशन कार्ड मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक शिबिरे घेतली आहेत   विधानसभेचे बिगुल वाढल्यामुळे बागलाण तालुक्यातील 170 गावागावात वाड्यावर भेट देऊन त्यांनी मतदारांचा कौल जाणून घेतला यामध्ये विद्यमान आमदार बोरसे यांनी आजपर्यंत आदिवासींच्या जीवावर मतदान मिळवले मात्र आदिवासी बांधवांसाठी काहीच केले नसल्याचा रोष आदिवासी बांधव व्यक्त करत आहे एकंदरीत या निवडणुकीत जनतेच्या मनात दोन्ही आजी-माजी आमदारांबाबत मात्र आदिवासी बांधवांसाठी काहीच केले नसल्याचा रोष आदिवासी बांधव व्यक्त करत आहे एकंदरीत या निवडणुकीत जनतेच्या मनात दोन्ही आजी-माजी आमदारांबाबत नाराजीचा सूर दिसत असून तिसरा पर्याय मतदार शोधत आहे मोरे यांनी भाजपाकडे उमेदवारी मागितले आहे   अत्यंत शांत स्वभाव हजर जबाबी  पणा  मनमिळावू स्वभाव   विकासाचा ध्यास  बहुजन समाजा सोबत असलेले सबंध   पाहता जर त्यांना पक्षाने उमेदवारी दिली तर नक्कीच ते मोठे मताधिक्य मिळवतील मात्र पक्षाने उमेदवारी न दिल्यास शेतकरी संघटना किंवा तिसरी आघाडी  किवां  अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्धार त्यांनी  स्थानिक पत्रकाराशी वार्तालाप करताना व्यक्त केला आहे

Previous articleबागलाण तालुक्यातील तुंगन दीगर व तुंगण पाडा येथील महिला किरकोळ दारू विक्रेते व जुगार पिढी चालवणार यांच्याशी झाले त्रस्त
Next articleग्रामविकास मंडळ ऐनारी मुंबई मंडळाची नवीन कार्यकारिणीची निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.