आशाताई बच्छाव
युवा मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वप्निल देशमुख यांचा अंगणवाडी सेविकांच्या वतीने सत्कार
संग्रामपूर :- याविषयी सविस्तर माहिती अशी की,संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील अंगणवाडी सेविका यांच्या वतीने युवा मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेश सरचिटणीस श्री. स्वप्निल (बापू) देशमुख यांचा त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला आहे.वानखेड येथील अंगणवाडी सेविका यांचा मुलगा आर्टिस्ट राम गोहलत यांनी स्वतःच्या हाताने स्वप्निल बापू देशमुख यांचा एक Porait फोटो बनविला असून राम गोहलत यांचे आई-वडिल व अंगणवाडी सेविकांकडून स्वप्निल देशमुख यांना भेट म्हणून देण्या आला.
स्वप्निल देशमुख आमच्या वानखेड गावाची आन,बान,शान असल्याचा आम्हाला अभिमान अभिमान असल्याचे उपस्थितांनी सांगितले प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी वानखेड या गावाचे नाव राज्यभर नेले असून अल्पावधीतच
पत्रकारिता क्षेत्रातून त्यांनी चांगले नावलौकिक मिळवले.
यावेळी अंगणवाडी सेविकांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, देशमुख यांनी आमच्या गावाचा
स्वाभिमान जागृत ठेवून
वानखेड गावचे नाव राज्य
पातळीवर पोहचवून
सामाजिक व राजकीय क्षेत्रात
आपल्या कार्य-
कर्तृत्वाची चुणूक दाखवून दिली .युवा मराठा महासंघ या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारून वानखेड गावाचे नाव उज्ज्वल केले.त्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आले. सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या वतीने युवा मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वप्निल देशमुख यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी स्वप्निल देशमुख यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून युवा मराठा महासंघ तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या माध्यमातून यापुढेही अनेक प्रकारचे समाजकार्य आपण करत राहू अशी ग्वाही उपस्थितांना ग्दिली.






