आशाताई बच्छाव
घरात घुसून विवाहितेस मारहाण, दागिने केले लंपास…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
खामगाव :-बुलढाणा शहरातील गजानन कॉलनीतील एका घरात घुसून विवाहितेला मारहाण करत सामानाची तोडफाड करून दोन लाखांचे दागिने लंपास करण्यात आले. ही घटना ३ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. तक्रारीनुसार, आसमा जबीन शेख इस्माईल (३८), रा. गजानन कॉलनी ही विवाहिता घरी असताना शहर पोलिसांनी ताजनगर येथील शेख नदीम शेख सलीम, शेख इरफान, शेख समीर शेख सलीम, मुज्जू सलाउद्दीन, अफजल, अनिस ठेकेदार, शेख परवेज शेख युसूफ ठेकेदार, जमदार ठेकेदार, सलीम ठेकेदार अशा ९ जणांनी घरात घुसून विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच विवाहितेचे दोन लाखांचे दागिने लंपास केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. या तक्रारीवरून ९ जणांवर भारतीय न्याय संहितेतंर्गत गुन्हे दाखल कले आहे.






