Home बुलढाणा नांदुऱ्यात एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी, वॉर्ड क्रमांक एकमधील घटना : चोरट्यांविरुद्ध...

नांदुऱ्यात एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी, वॉर्ड क्रमांक एकमधील घटना : चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल…

107

आशाताई बच्छाव

1000619710.jpg

नांदुऱ्यात एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी, वॉर्ड क्रमांक एकमधील घटना : चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल…
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
नांदुरा :-बुलढाणा शहरातील वॉर्ड क्रमांक एकमधील लक्ष्मीनगर भागात शुक्रवारी रात्री दोन ठिकाणी घरफोडी होऊन नगदी रकमेसह एक लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याची घटना घडली. याच दरम्यान आणखी एका घरात चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध नांदुरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत गुणवंत भाऊराव साबे (५०, रा. लक्ष्मीनगर), यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये शुक्रवारी रात्री दुचाकीचे गॅरेज बंद करून घरी झोपले. त्यावेळी अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले नगदी साठ हजार रुपये, सोन्याची दहा ग्रॅमची पोत, एक अंगठी, कानातील टॉप्स चोरून नेले.
घरापासून काही अंतरावर राहणारे उमेश हरिश्चंद्र पाटील यांच्या घरातील नगदी तीन हजार रुपये सोन्याचे दागिने,असा एकूण एक लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तसेच शेजारी राहणारे महादेव मोतीराम जाधव यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले. त्यावरून नांदुरा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ३३१ (४) ३०५ (अ) ६२ भारतीय न्याय संहितानुसार (बीएनएस) गुन्हा दाखल केला. अधिक तपास नांदुरा पोलिस करीत आहेत. चोरीच्या घटनांमुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Previous articleमाटरगावात रस्त्यांवर पाणी ! ग्रामस्थ हैराण, ग्रामपंचायत दुर्लक्षित !
Next articleनांदुऱ्यात एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी, वॉर्ड क्रमांक एकमधील घटना : चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.