Home बुलढाणा बिलाच्या कारणावरून हॉटेलमालकाची ग्राहकास मारहाण, नांदुरा ते मलकापूर रस्त्यावरील घटना : विविध...

बिलाच्या कारणावरून हॉटेलमालकाची ग्राहकास मारहाण, नांदुरा ते मलकापूर रस्त्यावरील घटना : विविध कलमान्वये केला गुन्हा दाखल

24
0

आशाताई बच्छाव

1000619693.jpg

बिलाच्या कारणावरून हॉटेलमालकाची ग्राहकास मारहाण, नांदुरा ते मलकापूर रस्त्यावरील घटना : विविध कलमान्वये केला गुन्हा दाखल
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
नांदुरा :-बुलढाणा बिल देण्याच्या कारणावरून हॉटेलमालकाने ग्राहकास रॉडने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता नांदुरा मलकापूर रोडवर असलेल्या हॉटेल राजमुद्रा येथे घडली. याप्रकरणी ग्राहकाच्या तक्रारीवरून हॉटेलमालकाविरुद्ध नांदुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रवीण जगन्नाथ मेहेसरे (वय ४२, रा. अर्बन कॉलनी नांदुरा, हल्ली मुक्काम चांदमारी खामगाव) यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता मित्रांसह गेलो असता नांदुरा मलकापूर रोडवर असलेल्या हॉटेल राजमुद्रामध्ये पंधराशे रुपयांचे बिल झाले. यावेळी मित्रांनी ते देण्यास सांगितले. त्याच्याकडे ५०० रुपये असल्याने उर्वरित रक्कम उद्या देतो,असे हॉटेलमालकास म्हटले. ते ऐकून न घेता हॉटेलमालकाने रॉडने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत जिवानिशी मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून आरोपी प्रवीण पाटील (रा. नांदुरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here